Monday, 19 November 2012

विशेष मुलाखत



             
                
             विशेष  मुलाखत
           
              नावं - श्री. अरूण  करमरकर  

                प्रस्तावना

    
      अभ्यासक्रमातील विशेष लेख आणि जनमत या विषयातील मुलाखत या घटकाच्या उपक्रमासाठी मी ठाणे येथिलच रहीवासी असणारे पत्रकार अरूण करमरकर यांची छोटेखानी मुलाखत घेऊन एकुणच पत्रकारितेतील बारकावे आणि श्री. करमरकरांचा पत्रकारितेतील अनुभव जाणुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.


                                 परिचय

*   १९९० साली केरळ राज्यात झालेल्या जातीय दंगलीचा अभ्यास करून  
 पत्रकारितेत पदार्पण.
*   तरूण भारत या दैनिकात उपसंपादक पदाचा अनुभव.
*   पुण्यातुन प्रकाशित होणा-या विमर्शनावाच्या त्रैमासिकाच्या संपादक   
  पदी कार्यरत.
*   न्युज भारतीया ऑनलाईन बातम्या प्रसारित करणा-या माध्यमात  
   वरिष्ठ संपादक पदी कार्यरत.

                   
                   अशी असते पत्रकारिता.......!

    महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आजतागायत वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, मासिके इत्यादींनी समाजकारणात नेहमीच मोलाची भुमिका बजावल्याचे दिसुन येते. हाच सुवर्ण योग साधुन पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या पत्रकार अरूण करमरकरांचे नाव घेणेही तितकेच औत्सुक्याचे ठरेल. या निमित्तानेच श्री.करमरकरांची मुलाखत घेण्याचा योग आला आणि एकुणच पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे अनुभव आणि पत्रकारितेतील बारकावे यांचा उलगडा मुलाखती निमित्त झाला तो असा........
    पत्रकारिता या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तेव्हाची पत्रकारिता आणि सद्यस्थित पत्रकरिता यांत श्री.करमरकरांना बरेचसे साम्य आढळुन आले. १९९० च्या दशकात आपल्या देशात तंत्रज्ञानाचा विशेष असा प्रभाव नव्हता.त्या वेळेस पत्रकारितेला विशेष वाव देखिल नव्हता. यामुळे पत्रकारितेतुन मिळणारे उत्पन्न देखिल तुटपुंजे असत. परंतु काळ जसजसा बदलत गेला तसतसा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात होत गेला. पुरेसा वाचक वर्ग यासर्वांमुळे प्राप्त झाल्याने पत्रकारितेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याचबरोबर दिवसागणिक वृत्तपत्रांची संख्या ही वाढतच आहे. परंतु हा बदल जसा झपाट्याने होत गेला तसतशी पत्रकारिता ही देखिल तीच्या मुळ उद्देशापासुन भरकटत चालल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
       लोकमान्य टिळकांचा केसरी, आचार्य अत्र्यांचा मराठा ही पुर्वीची वृत्तपत्रे टिळक,अत्रे अशा संपादकांच्या नावानेच जास्त प्रचलित होती.परंतु आताच्या काळात ही परिस्थिती राहीली नसुन संपादकीय अग्रलेख अथवा त्या संपूर्ण पानालाच महत्त्व राहीलेले नाही त्यामुळे त्या विशिष्ट वृत्तपत्राचे संपादक कोण ? इथपासुन सुरूवात होताना आपल्याला दिसत आहे. आताची वृत्तपत्रे ही संपादकाच्या नावाने प्रचलित नसून ते वृत्तपत्र कोणत्या ग्रुपचे आहे ? अशी ओळख निर्माण झाली आहे (उदा.टाइम्स ग्रुप, एक्सप्रेस समूह इ.) यामुळे पुर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता ही वैचारिक प्रधानतेकडून व्यवसायीक प्रधानतेकडे वाटचाल करताना दिसत आहे. त्याचबरोबर सध्याच्या पत्रकारितेत नैतिकतेचा अभावही दिसत आहे.
      पूर्वी एखाद्या बातमीच्या ठिकाणाचे फोटो काढताना/ छापताना त्यात्या वृत्तपत्राच्या संपादकाशी चर्चा होत असत, परंतू आता असे अजिबात दिसत नसुन स्त्रियांची अर्धनग्नताही सर्रास फोटोमधुन दाखवली जात आहे.किंवा एखाद्या घटनेचे अधिक भडकाऊ चित्रण दाखवणे सुध्दा स्पर्धात्मक बनले असुन यातुन अनपेक्षीत चढाओढ अनुभवयास मिळते. हे सर्व घडत असताना जाहिरातीसुध्दा वृत्तपत्रांच अविभाज्य अंग बनत आहे. हे एका आर्थिक पातळीपर्यंत ठिकही असेल परंतु याचा पत्रकारितेवर विपरीत परिणाम होत आहे. आताच्या काळात वृत्तपत्रांची आर्थिक तुट भरून काढण्यासाठी वृत्तपत्रांच्या वार्ताहारांना जाहिरातीच टार्गेट दिले जाते त्यानुसार प्रत्येक महिन्याला त्याने ठराविक जाहिराती आणणे आवश्यक आहे. जाहिरातींची ही नविन जबाबदारी आताच्या पत्रकारांवर पडली असुन पूर्वी अशाप्रकारच्या जबाबदा-या दिल्या जात नव्हत्या. मुळातच त्याकाळी वृत्तपत्र काढण्याचा मुळ उद्देश निराळा असल्याने जाहिरातींचा प्रश्नच उद्भवत नव्हता. हाएक व्यवसायीक बदल झाला असुन पत्रकारितेतला अभ्यासुपणा आणि ध्येयवाद कुठेतरी लोप पावत आहे. सध्याच्या या परिस्थितीने सामाजिक नितिमत्ता आणि पत्रकारितेच समाजातील स्थान टिकवुन ठेवणे कष्टाचे झाले आहे. पत्रकारितेसमोर अशाप्रकारची आव्हाहने निर्माण झाली असून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यास, याचबरोबर जनमानसांत पत्रकारिती जाणिव निर्माण करणे गरजेच आहे.
    पत्रकारिता क्षेत्रात पारंगत होण्यासाठी विशेष वाचनाची आवड असणे गरजेच आहे. आपल आवडत क्षेत्र सोडून इतर क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानही अवगत असणे आवश्यक आहे. आपल्या आवडत्या क्षेत्राचा त्याने सखोल अभ्यास करावा. दैमंदिन घडणा-या घटनांव्यतिरिक्त त्याने इतर बाबतीतही अपडेट असणे गरजेच आहे. यासाठी वृत्तपत्रे, मासिके, नियतकालित, इंटरनेट यांचा पुरेपुर वापर करावा. आताच्या काळात इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा विशेष प्रभाव जनमानसांत पडत असला तरी प्रिंट मिडीयावर याचा काही परिणाम होणार नाही. वृत्तपत्रे आजही तेवढ्याच जोमाने आपला वाचक वर्ग टिकवुन आहे. दिवसेंदिवस नविन चॅनेल्स, दैनिक, साप्ताहिके, मासिके यांच्या संख्येत भर पडत असुन यामुळे नविन रोजगाराच्या संधी दोन्ही माध्यमांत उपलब्ध आहेत.
     आजच्या काळात गुन्हेगारांत कायद्याचा धाक राहिला नसुन पत्रकार संरक्षण कायदा आमलात आणला तरी याचा पत्रकारांना फायदा होइल असे तरी वाटत नाही. यामुळे आताच्या पत्राकारांनी पत्रकारितेची नितीमुल्ये टिकवुन ठेवणे गरजेच असुन लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी असलेली ओळख यातुन नक्किच सार्थ ठरेल !



   अविस्मरणीय अनुभव
        मुंबईत जिल्हा परिषदेच्या शाळांत १५-२० वर्षे सेवा केल्यानंतर मुंबई मनपा च्या शाळांत स्थलांतरीत झालेल्या सुमारे ४०० शिक्षकांचे निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात सरकार आडकाठी करत होते. परंतु श्री.करमरकर यांनी दै.तरूण भारत मध्ये हा विषय लावुन धरल्याने त्यावेळेसच्या युति सरकारने याप्रकरणाची दखल घेऊन त्या निवृत्त शिक्षकांना पेन्शन देऊ केली.

  



               






                              


                              




     

   

    

No comments:

Post a Comment