Monday, 19 November 2012

वॉल्ट डिस्ने एक अविष्कार





   वॉल्ट डिस्नेचा चमत्कार, लहरीपणा आणि आशावादी स्वभावाशिवाय ह्या जगाची कल्पना करणे केवळ अशक्यच. माध्यमाद्वारे आज आपण जी विविधता अनुभवत आहोत अशा या मनोरंजन विश्वाचे स्वरूप वॉल्ट डिस्ने च्या अविष्काराने बदलून टाकले. त्याच्या कालखंडात त्याने अँनिमेशन क्षेत्राचा अभ्यास करून शिकण्याचा आणि शिकवण्याचा नविन मार्ग शोधून काढला.
  पूर्ण सिनेमा पाहण्याच्या अनन्य योजनेतूनच त्याचा आशावाद उदयास आला. आपल्या श्रोत्यांना जे काही सांगायच/ सिनेमातून दाखवायच आहे हे तो संवादाशिवायही  व्यक्त करू शकत होता. ह्याचाच परिणाम म्हणजे त्याने आपल्याला या क्षेत्रातून ज्या तंत्रज्ञानाची विविध क्लृप्त्यांची योजना तुकड्या तुकड्यांतून विभागून दिली नाही. तर त्याने आयुष्य अधिक मजेशीर बनवण्याच्या ध्येयाला तंत्रज्ञानाची जोड दिली आणि ते साध्य केले. याचाच एक परिणाम म्हणजे चित्रांची भाषा संवाद साधण्यासाठीही उपयोगी ठरू लागली. त्याच्या आयुष्याच्या हॉलीवूडच्या ४३ वर्षांच्या  कारकिर्दीत त्याने मोशन पिक्चर च्या कलेत सुधारणा घडवून आणून आधुनिक अशी चित्ररूपी संवाद साधण्याची कला नव्या स्वरूपात उदयास आणली.
   सध्याची पिढी त्याच्या या चित्ररूपी संवादाचा स्वाद घेत आहे. हल्ली जेवढे महत्त्व मौखिक संवादाला आहे तेवढेच महत्त्व अमौखिक संवादाला देखिल लाभले आहे. कारण ह्या अमौखिक संवादाने एका विशिष्ठ काळात किंवा जागतीक चित्रपट सृष्टीच्या काळात आपला ठसा उमटवल्यामुळे त्याचे हे महत्त्व आजही टिकून आहे. कारण जागतीक चित्रपट सृष्टीची सुरूवातच चल-चित्रांनी झालेली आहे.
    चित्रांची भाषा ही सर्वदूर समजली जाणारी भाषा यासाठीच कारण एखाद्या माध्यमाद्वारे जनसंवाद साधत असताना जेवढा कस लागतो तेवढाच किंवा त्यापेक्षाही जास्त कस चित्र स्वरूपातील संदेश पोहचवण्यासाठी लागतो. कोणत्याही संवादाशिवाय एखादी संकल्पना, विचार आपल्याला चित्र स्वरूपात सादर करावी लागते. अशावेळेस त्या विषयाला न्याय देणा-या प्रभावी चित्रांचा संग्रह, चित्रांची भावना/ जाण असणे आवश्यक आहे. त्यातुनच अमौखिक संवाद जनतेसमोर अधिक प्रभावीपणे सादर होत असतो. ह्याच उदाहरणच द्यायच झाल तर, सध्या ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या कार्यक्रमामुळे गाजत असलेल्या सब टिव्ही वर दाखवण्यात येणा-या “American funny video” हा कार्यक्रमातून अमौखिक संवादाच उत्तम सादरीकरण करण्यात येत. या कार्यक्रमातून भरपूर विनोद, मनोरंजन घडताना दाखवला जातो. अमेरिकन ब्रॉडकास्टींग कं.चा अविभाज्य भाग असलेल्या Disnep चा हा कार्यक्रम असल्याने हे वरील विषयाचे उत्तम उदाहरण आहे. हा कार्यक्रम पाहिल्या नंतरच आपल्या लक्षात येईल की वॉल्ट डिस्ने यांच वचन प्रत्यक्षात किती प्रभावी आहे.

No comments:

Post a Comment