आपण
सर्व जण आपापल्या घरी टि.व्ही. बघत असतो. त्यामुळे अर्थातच जाहीराती या आल्याच.
एखाद गाणं आपल्याला आवडले की ते गाणे आपण सतत दिवसभर गुणगुणत असतो. जाहिरातींचे
देखिल तसेच असते. जाहिरातींमधिल आपल्याला आवडलेल पात्र किंवा डायलागआपण सतत
गुणगुणत असतो किंवा मित्रांसमवेत त्या डायलॉग्स चा वापर करत असतो. म्हणजेच आपण त्या
जाहिरातींकडे विशिष्टप्रकारे आकर्षित झालेलो असतो. अशा या विविध प्रकारच्या
जाहिराती आपण टि.व्ही. प्रमाणेच रस्त्यांवरील होर्डींगवर, रेडिओ किंवा Pamplates द्वारे आपण
बघत किंवा ऐकत असतो .
आजच्या घडीला जनमानसावर जाहिरातींचा मोठा
पगडा आहे. जाहिरात हे वस्तू व सेवांच्या प्रसाराचे माध्यम असल्याने उत्पादक विविध
क्लृप्त्या लढवुन विविध प्रकारची उत्पादने लोकांसमोर जाहिरातींच्या माध्यमातुन
आणतात. अशा वेळेस उत्पादकाकडून ग्राहकांना नकळतपणे चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न
होतो. त्यामुळे जाहिरातींमध्ये प्रमाणिकपणा असणे गरजेच आहे. अशाच काही जाहिराती
जनतेच्य़ा आवडत्या व नावडत्या जाहिराती बनलेल्या आहेत. जनतेप्रमाणे मला देखिल काही
जाहिराती आवडतात व काही जाहिरातींबद्दल माझे वेगळे मत असल्याने त्या जाहिराती मला
न पटलेल्यांपैकी आहेत.
दूरदर्शनवर कधीतरी दाखवली जाणारी ट्राफीकच्या
नियमांसंदर्भातील जाहिरात ही मला आवडलेल्या जाहिरातींपैकी एक आहे.
यामधे माणूस आणि कुत्रा यांची ट्राफीकमधे
रस्ता पार करतानाची मानसिकता दाखवण्यात आलेली आहे. माणूस हा चलबिछल प्राणी
असल्याने तो नेहमी नियमांकडे दूर्लक्ष करीत असतो. अशाचप्रकारे तो ट्राफीकमधे लाल
सिग्नल लागलेला नसतानाही जीव धोक्यात घालून रस्ता पार करत असतो. अशा वेळेस कुत्रा
मात्र लाल सिग्नल लागल्यावरच रस्ता सुरक्षीतपणे पार करतो. माणसाला ट्राफीकचे नियम
माहित असताना देखील नियम पायदळी तुडवून रोजचे जिवन जगत असतो. अशा वेळेस
कुत्र्यसारख्या मुक्या प्राण्याकडून काहीतरी शिकुन घेऊन त्याचे गुण आमलात आणण्याचा
संदेश ही जाहिरात देते.


त्याचप्रमाणे नावडत्या जाहिरातींमधे i pill , Unwanted 72 यांसारख्या Pragnency
टाळणाय्रा गोळ्यांची जाहिरात मला न पटलेल्या जाहीरातींपैकी आहे. यामधे उत्पादकाचा
आपलं उत्पादन बाजारात आणण्याचा हेतू जरी वेगळा असला तरी सध्याची युवा पिढी त्या
उत्पादनाचा दुरूपयोग करेन याची उत्पादकाला जाणिव नसावी. कारण अनैतिक संबंध ठेवुन
यासारख्या गोळ्यांद्वारे हे प्रकरण सुरक्षितपणे निस्तारले जाऊ शकते. त्यामुळे युवापिढी
समोर या जाहिरातीचा वाईट संदेश जातो.
No comments:
Post a Comment