रिलिजीयस ह्या
चित्रपटात / डॉक्युमेंट्रीत
मुलाखातकाराने जो प्रयत्न केला आहे किंवा विविध धर्मांतील लोकांच्या मुलाखती
घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो सध्याच्या विज्ञानात्मक युगात खरंच विचार करायला
लावणारा आहे.आपण जरी माध्यमाचे अभ्यासक असलो आणि देवावर जरी आपली श्रध्दा असली तरी
हल्लीच्या विज्ञानात्मक युगात अशा गोष्टींना ऐतिहासिक पुरावे आवश्यक असतात. आणि हे
पुरावे कोणीतरी किंवा त्या धर्मातील ग्रंथात कथन केलेले असतात. त्यामुळे अशा
पुराव्यांवर विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतो.
मानवीसृष्टी या संकल्पनेचा जर विचार करायचा झाल्यास ही सृष्टी कोणीतरी
निर्माण केली आहेच ना. त्यामुळे देव ही संकल्पना या पृथ्वीवर आहे की नाही असा
प्रश्न ज्याच्या मनात निर्माण होतो किवा हि संकल्पना मानण्यास जर एखादी व्यक्ती तयार नसेल तर त्याने मानवी
सृष्टीच्या निर्मात्याला गृहित धरूनच आपले आचरण केले पाहिजे. कारण या सृष्टीत मानव
हा घटक म्हणून आपण उपस्थित असतो. आणि मानवी घटक या नात्याने सृष्टीतील इतर घटकांच
संगोपन केल तरी ती एक प्रकारची भक्तीच होऊ शकते कारण आजच्या घडीला ह्या पृथ्वीवरील
अनेक प्रजाति नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा ह्या प्रजातिंच संगोपन केल्यास
किंवा त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्यास एक प्रकारच पुण्य कमावण्यासारखच आहे.
माध्यमांच्या दृष्टीकेनातून ह्या गोष्टींकडे
बघायच झाल्यास अशा गोष्टींवरील विश्वास प्रखरपणे दाखवावा कि दाखवू नये हा त्या
त्या माध्यमाच्या पॉलीसीचा प्रश्न आहे. माध्यमे ही जनतेसाठी आहेत जनता
माध्यमांसाठी नाही. त्यामुळे Majority of People जर एखादा धर्म किंवा त्यातील सण परंपरा
साजरे करत असेल तर माध्यमांसाठीही अशा गोष्टींची दखल घेणे आवश्यक आहे. हे
माध्यमाच्या प्रेक्षक वर्गावर अवलंबून आहे.
अशा प्रकारे धर्म ह्या संकल्पनेवर काळानूरूप विश्वास ठेवावा कि ठेवू नये हा
प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
No comments:
Post a Comment