श्यामलाल हे जेष्ठ पत्रकार व टाइम्स ऑफ इंडिया या नामांकित
वृत्तपत्राचे संपादक होते. इतिहास, समाजकारण व तत्वज्ञान हे श्यामलाल यांचे आवडते विषय होते. इंग्रजी
साहित्यात पदवीचे शिक्षण घेत असतानांच त्यांना १९३४ मध्ये पत्रकार होण्याची संधी
मिळाली. “हिन्दुस्थान टाइम्स” या प्रख्यात इंग्रजी दैनिकात त्यांना
विनामोबदला प्रशिक्षणार्थि पत्रकार म्हणून सेवेत घेण्यात आले. देवदास गांधी हे
त्यांचे त्यावेळचे सहकारी होते.
हिन्दुस्थान
टाइम्स मधील १२ वर्षाची सेवेनंतर ती नोकरी सोडून १९५० मध्ये श्यामलाल “टाइम्स ऑफ
इंडीयाच्या” सेवेत रुजू झाले. तेथे ते
संपादक पदा पर्यंत पोहचले, त्यांची ही कारकिर्दी खुप गाजली. संपादकीय पानावर प्रसिध्द
होणारे लेख ते स्वत काळजी पुर्वक वाचून निवड करीत असत. गुणवत्ता हाच एकमेव निकष ते
लेखाबाबत ठेवत असत. त्यामुळे गुणवत्ता नसेल तर केवळ अभिनेते, राजकीयनेते, अन्य
प्रसिध्द व्यक्ती किंवा पंतप्रधान देखील असले तरी त्यांचे लेख नाकारण्याबाबत ते ठाम असायचे. श्यामलाल आपल्या तत्वापासून
अजिबात ढळले नाहीत. छोट्या छोट्या वाक्यात आणि साध्या सोप्या शब्दांत अग्रलेख
लिहीण्यवर त्यांचा भर असायचा. सहका-यांनी ते अलंकारीक व बोजड न लिहिता, सुटसुटीत व
सुबोध लिहा असा आग्रह करित असत.
श्यामलाल यांनी आपल्या कारकिर्दीत संपादक म्हणुन खुप लिखाण केले, पण
त्याच बरोबर आंबेडकर, इंडियन रिअलिटीस्, क्रिटीक, आणि हंण्ड्रेड इनकांऊटर अशा
वेगवेगळ्या विषयावर चार पुस्तके देखील लिहिली आहेत. संपादकीय बरोबर त्यांनी विविध सदरे
देखिल लिहिलीत, द नॅशनल सीन, चित्रपट परिक्षण, लिटरेचर व्हियु, आणि लाईफ अण्ड
लेटर्स हे सदर खुप गाजले. त्यांनी आपल्या
लिखाणातील शैली व वेगळेपण जपले. सामाजीक प्रश्न व समाज प्रबोधन करणारे लेखण
श्यामलाल यांनी केले. साधे ,सरळ व सोपे लेखण करणारे लेखक अशीच श्यामलाल यांची ओळख
होती.
No comments:
Post a Comment