Monday, 19 November 2012

संस्कृती आणि संज्ञापन




 

    संस्कृती संज्ञापन ही एकप्रकारची संवादाचीच प्रक्रिया आहे ज्यात मानवी संस्कृतीच प्रतिबिंब उमटत असत. म्हणजेच संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आपण संस्कृतीच्या दृष्टीकोनातून परिक्षण करू शकतो. हा दृष्टीकोन आपणास सतत घडत असलेला संवाद कोणत्या संस्कृतीच प्रतिनिधीत्व करत आहे याची जाणिव करून देतो. मानवी जीवनात संस्कृतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मानवी समाजात संस्कार घडवण्यात संस्कृती आपली महत्त्वाची भूमिका बजावते.
  सध्याच्या माध्यम प्रगल्भतेच्या काळात प्रस्तूत विषयाची खबरदारी प्रत्येक जबाबदार माध्यम घेत असतो. कारण माध्यमाद्वारे घडणा-या प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रीया प्रेक्षकांकडून येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे माध्यमाने दाखवलेली एखादी समाजपयोगी गोष्ट प्रेक्षकांना पटते प्रेक्षक तीच स्वागत करतात.पण या उलट जर एखादी गोष्ट न पटल्यास प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रीया येऊ शकतात. त्यामुळे जर वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, रेडिओ, इंटरनेट या सारखी माध्यम जर एखाद्या संवाद आणि संस्कृतीशी संबंधीत गोष्टींबद्दल जागरूकता करत असतील तर संवादाच्या आणि संस्कृतीच्या देवाण-घेवाणीची प्रक्रीया सुलभ होऊ शकते.
      परंतू येथे जनरेशन गॅपचा मुद्दा नक्कीच मांडला पाहिजे. जनरेशन गॅपमुळे संवाद आणि संस्कृतीत बदल घडत असलेला आपण पाहतच आहोत.पाश्चात्य संस्कृतीच अनुकरण आणि अधुनिक तंत्रज्ञानाची संवाद / संज्ञापनाला असलेली  जोड हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे माध्यमांनी याचे भान ठेवूनच लोकांना मार्गदर्शन आणि मनोरंजन करण्याची भूमिका बजवावी. इंटरनेट हे माध्यम गेल्या दोन दशकांपासून उदयास आले आहे. त्यामुळे या माध्यमाला आपल्या संकल्पनेत काळानुरूप बदल करणे अपरिहार्यच तर आहेच. परंतू वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, रेडिओ इ. माध्यमांनाही खूप वर्षांपूर्वी पासूनचा इतिहास असल्याने काळानुरूप स्वतःच्या संकल्पनेत, भूमिकेत बदल घडवून आणणे आवश्यकच आहे. आणि ह्या सर्वांचा अनुभव आपल्याला वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, रेडिओ, इंटरनेट यासारख्या माध्यमांचा अस्वाद घेत असताना येतो.
  हल्लीच्या धका धकीच्या युगात संस्कृतीचे संवर्धन करण्यात कोणाला वेळच नाही असे वाटते(अगदी माध्यमांनाही). कारणही तसच आहे, पाश्चात्य संस्कृतीच लोण सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत आहे की, आपली संस्कृती त्यामोर तग धरण्यासाठी धडपडत आहे. आताच्या ऑनलाईन जगतात प्रत्यक्ष संवाद साधणे कठीण झाले आहे.काही वर्षांनी ही परिस्थिती आणखीनच बदलण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे, संस्कृती आणि संज्ञापन ह्या एकमेकांशी संबंधीत गोष्टी जरी असल्या तरी काळानुरूप बदल घडत आहेत हे देखिल आपण मान्य केले पाहिजे.

No comments:

Post a Comment