का विशिष्ट भाषेच्या माध्यमातून संवाद
साधण्यासाठी शब्दांची गरज, आवश्यकता निर्माण होते. संवादाला प्रभावित करणारे अनेक
घटक आहेत त्यापैकीच एक म्हणजे शब्द.शब्दांमुळे संवादाला एकप्रकारची धार निर्माण
होते. यासाठी उत्तम अशा शब्दभंडाराची गरज असते आणि ते शब्दभंडार संवादाद्वारे
व्यक्त करण्यासाठी चांगल माध्यम आणि साधनांची गरज असते.
वॉल्ट व्हिट्मॅन यांनी काव्यपंक्तीत
सांगितल्याप्रमाणे शब्दांचा रोखच महत्त्वाचा आहे एखाद्या व्यक्तीला नेहमी पेक्षा
वेगळ्या भाषेत सुनवायच असेल किंवा अद्दल घडवायची असेल तर विशिष्ट रोख असलेले शब्द
वापरू शकतो ज्यामुळे शब्दांचा मारा हा त्या व्यक्तीला हतबल करू शकतो. शब्द हे
समाजाला एकप्रकारची ओळख निर्माण करून देतात.
समाजातील काही गोष्टींचा उलगडा करण्यास मोलाची भूमिका बजावात. समाजातील असे काही
प्रचलित शब्द असतात की जे आवेशपूर्ण
असतात (उदा. मराठीत, “भाऊ जरा दमाने.”). त्यामुळे
हे शब्द जरी मजेशीर , विनोदी वाट असले तरी आपल्या मनातील भावना या शब्दांद्वारे
अनेक मार्गाने बाहेर पडत असते.
भिकारी भिक्षा मागत असताना शाब्दीक विनंती
करतो परंतू त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनात अशी शंका येते की ह्याला जर
भिक्षा दिली तर हा तीचा दूरूपयोग तर करणार नाही ना....? कदाचीत त्याचा भिक मागण्याचा
उद्देशही वेगळा असू शकतो...हे पहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शाब्दीक आवेशही
ताच महत्त्वाचा घटक आहे. शाब्दीक आवेशाने आपल्या भावनांचे प्रकटीकरण,विषयाचा आशय
कळतो.
माध्यम क्षेत्रात असा
रोख असणा-या शब्दांचा वापर जरा सांभाळून करावा लागतो. एखाद्या घटनेची तीव्रता,
भावना शब्दांतील आवेशावरून ठरते.शब्द जितके प्रभावी तितकी घटना भावनात्मक वाटते.
त्यामुळे वॉल्ट व्हिट्मॅन यांच्या मते शब्द काहीच नाही त्यांचा रोखच सर्व
काही ह्याचे समर्थन करावेसे वाटते.