Monday, 19 November 2012

गोष्ट अंतराची






 
     डेव्हिड बोर्डवेल हा अमेरिकन सिनेसृष्टीचा इतिहासतज्ञ होता.त्याने आपल्या सिनेसृष्टीच्या कारकीर्दी दरम्यान सिनेमाच नॅरेशन हे १५ खंडांच पुस्तक काढल त्यामुळे त्याने मांडलेल्या विषयात नक्कीच तथ्य आहे यात तिळमात्र शंका नाही.
   एखादी गोष्ट जर प्रेक्षकांना कथे स्वरूपात सादर केली जाते त्यानंतर ती कथा माध्यमाचा वापर करून एका विशिष्ट भाषेतून सांगितली जाते.अशा वेळेस त्या कथेला एका अधुनिक माध्यमाची जोड दिलेली असू शकते. त्यामुळे मूळ गोष्ट आणि कथा यांत फरक असू शकतो.कारण माध्यम ही जनतेसाठी असतात. आपला प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवून ते माध्यम एखादी गोष्ट सादर करत असत.त्यामुळे प्रेक्षकांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि स्वरूपात ती गोष्ट सादर केली जात असेल तर त्या गोष्ट आणि कथेत अंतर किंवा फरक आढळून येणे सहाजिकच आहे.
   एखादी गोष्ट कोणतही माध्यम न वापरता किंवा केवळ संवादाचा वापर करून जर सादर केली तर प्रेक्षकांना त्या गोष्टीच मनात कल्पना करण्या व्यतिरीक्त काहीच करू शकत नाहीत. परंतू ती गोष्ट जर आधुनिक माध्यमाचा वापर करून दृकश्राव्य स्वरूपात सादर केली तर जनतेला प्रत्यक्ष परिस्थीती बघण्याची , अनुभवण्याची संधी प्राप्त होते. प्रेक्षकांना त्या गोष्टीबद्दल एक प्रकारची  अभिरूची निर्माण होते. विषयाशी निगडीत दिलेल्या उदाहरणाचे हे अनुरूप/सार्धम्य साधणारे  विश्लेषण आहे. कारण प्रेक्षकांना आता एखादी गोषट दृकश्राव्य स्वरूपात पुरावा म्हणून पाहणे गरजेच वाटत आहे, त्याची एखाद्या गोष्टीबद्दल कल्पना करणे बहूतेक पटत नसावे.एखादी गोष्ट सादर करत असताना तीला अनुरूप चित्र/दृष्य   सादर केल्यास प्रेक्षकांना ती गोष्ट अधिक चांगल्या रितीने समजून घेता येते. परंतू एखी घटना केवळ गोष्ट स्वरूपात दाखवली जाते किवा कोणत्याही चित्रांविना दाखवली जाते त्यावेळेस त्या गोष्टीला पुरावा नसल्याने त्या गोष्टीला प्रेक्षकांची विश्वासहर्ता मिळेल की नाही या बद्दल शंका उपस्थित होते.
    परंतू आताच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांत बदल घून आल्याने वरील बाब आपल्याला क्वचितच पहावास मिळते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे एखाद्या गोष्टीशी संबंधीत फोटो/दृष्य सादर केल्याने माध्यमांची प्रगल्भता आणि अधुनिकता आपल्या लक्षात येते.





No comments:

Post a Comment