हल्लीच्या काळात मनोरंजकता वाढवण्यासाठी
कोणत्याही खेळात अधिकाधिक प्रयत्न केले जातात. मनोरंजकतेच्या या हव्यासापोटी
खेळातील सभ्यतेला दिवसेंदिवस ग्रहण लागत चालल्याचे चित्र दिसत असून आताच्या
काळातील क्रिडा प्रकाराचे एकुण स्वरूप हे सर्व अंगानी बदलत आहे. त्यात भर पडत आहे
ती फिक्सींग प्रकरणाची. हे फिक्सींग प्रकरण इतर खेळांप्रमाणेच क्रिकेट या खेळात
देखिल नेहमीच चर्चेत राहिलेल प्रकरण आहे. बेटींग आणि फिक्सींग प्रकरणाने संपूर्ण
क्रिकेट विश्व ढवळुन निघाले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भात रोज नवनविन
माहिती प्रसिध्द होत आहे. अशा परिस्थितीत बेटींग कसे चालते ?फिक्सींग म्हणजे काय? याची भरपूर
उत्सुकता पहावयास मिळत आहे. क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीबरोबरच एकुण क्रिकेट
विश्वाबद्दल शंकास्पद परिस्थीती निर्माण करणा-या बेटींग आणि फिक्सींग विश्वाचा
थोडक्यात आणि विविध मुद्द्यांद्वारे आढावा घेण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या
माध्यमातुन केला आहे.

एखाद्या सांघिक
खेळात ठराविक एक संघ पराभूत व्हावा किंवा विजयी व्हावा यासाठी त्यासंघातील काही खेळाडूंना काही
अपप्रवृत्तींकडून पैशांचे आमिष दाखवुन विरूध्द वर्तन करण्यास भाग पाडले जाते यालाच
मॅच फिक्सींग म्हणतात.
या अपप्रवृत्ती म्हणजे सट्टेबाज. या
सट्टेबाजांमुळे किंवा सट्टेबाजांसाठी मॅच फिक्सींग होते. ही सट्टेबाजी कोटींच्या
घरात असते. या सट्टेबाजीला लागणारी रक्कम ही सट्टेबाजांचे स्वतःचे भांडवल नसते.
यात अनेकांनी लावलेल्या १०-२०-५०-१००-१००० अशा छोट्या छोट्या रकमांतुनच
कोट्यावधींची रक्कम उभी होते. अशा या कोट्यावधींच्या रकमेच्या जोरावरच हे सट्टेबाज
त्या त्या खेळाची रंगत, सभ्यता, पावित्र्य घालवतात. यात सट्टेबाज जितके दोषी असतात
तेवढेच दोषी यात पैसे लावणारे देखिल असतात. म्हणजेच गुन्हेगारांइतकेच त्यांचे
साथीदारही दोषी असतात. परंतु यात सट्टेबाजांना आपली कातडी बचावण्याची वेळ आल्यास
आपल्या साथीदाराचा / हितशत्रूंचा काटा काढायलाही मागे-पुढे पाहत नाहित.
अशाप्रकारे
मॅचच्या निकालावर ‘गंमत’ म्हणून किंवा ’टाईम-पास’ म्हणून जे जे कोणी पैसे लावतात, त्या सगळ्यांचे हात
सट्टेबाजीच्या रक्ताने बरटले आहेत.

क्रिकेट
या क्रिडाप्रकाराला १००-१५० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. सुरूवातीला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट-इंडीज यांसारख्या देशातच
क्रिकेट खेळले जात. नंतर हळूहळू या खेळाचा प्रसार इतर देशांत झाला. भारत,
श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या आशीयाई देशांनीही क्रिकेटवरील आपली मक्तेदारी,
वर्चस्व सिध्द केले आहे. क्रिकेट या खेळाला सभ्य लोकांचा खेळ असेही म्हटले जाते.
परंतु आताच्या काळात हे कागदावरच ठिक असुन प्रत्यक्षात क्रिकेट या खेळाचा विस्तार,
लोकप्रियता, त्यातील अनैतिक प्रकार यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच या क्रिडा
प्रकारात २०-२० क्रिकेटने आणखीनच भर टाकली आहे. अशा अतिजलद क्रिडा प्रकाराच्या
नादात क्रिकेट त्याच्या दर्जापासून, सभ्यतेपासून दूर जात आहे. अशा या क्रिकेटमधुन
होणा-या अतिमनोरंजकतेच्या मोहापायी क्रिकेट प्रेक्षकांमधिल अनैतिक प्रकारात वाढ
होत आहे. एखादी मॅच बघत असताना उत्सुकतेपायी ती मॅच कोण जिंकणार? कोण किती रन करणार? कोण किती विकेट
घेणार? कोण टॉस जिंकणार? यासारख्या गोष्टींवरून मित्र आपापसांत बेट्स (पैज) लावत
असतात. अशा बेट्स लावल्यानंतर पुढे काय होत? हे आपणांस चांगलच ठाऊक आहे. परंतु अशा बेट्स लावणा-या व्यक्तिंना
शोधुन काही सट्टेबाज अशा व्यक्तिंना पैशांच आमिष दाखवुन आपल्या जाळ्यात ओढण्याचा
प्रयत्न करतात.
अशाप्रकारे
यातुनच पुढे बेटींग आणि सट्टेबाजीला प्रोत्साहन मिळते आणि क्रिकेट या खेळात
अपप्रकार घडण्यास सुरूवात होते. कारण हेच सट्टेबाज क्रिकेटमधिल प्रक्षकांच्या
उत्सुकतेपायी थेट खेळाडुंशी संपर्क करून पैशांचे आमिष दाखवुन त्यांना विशिष्ट
पध्दतीनेच खेळण्यास भाग पाडतात. याचा फायदा सट्टेबाजांनाच होतो. कारण अशा
सट्टेबाजीत १० ते १००० रू. अशी रक्कम लावणा-यांची संख्या ही हजारोंच्या घरात
असते.आणि यात एकाच निर्णयावर अनेकांचे ठाम मत असते. परंतु या मताविरूध्द एखादी
गोष्ट घडली तर याचा फायदा बुकींनाच होतो. आणि इथुनच मॅच फिक्सींगला सुरूवात होते.
क्रिकेटचा
इतिहास लक्षात घेतला तर ९०च्या दशकापासून फिक्सींग प्रकरण प्रकाशात येत आहे. मॅच
फिक्सींगची अनेक प्रकरणे सिध्द झाली असून त्यात अनेक क्रिकेटपटूंना आपल्या क्रिकेट
कारकीर्दीला रामराम ठोकावा लागला आहे. १९९९ मध्ये अनिरूध्द बहल आणि तरूण तेजपाल या
पत्रकारांनी (तेहेलका नावाच्या न्युज वेबसाईटचे पत्रकार) भारतीय क्रिकेटमध्ये
चालणा-या अनैतिक प्रकारांवर स्टिंग-ऑपरेशन केले. १९९९ मध्ये भारतात झालेल्या
दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या क्रिकेट मालिकेत अफ्रिकेचा कर्णधार हॅन्सि क्रोनिए आणि
सट्टेबाज यांच्यातील संभाषण टेपिंग केले. आणि यातुन हॅन्सि क्रोनिएने
भारताविरूध्दची ती मॅच हरण्यास पैसे घेतल्याचे उघड झाले. या फोन टेपिंग प्रकरणात
दिल्ली पोलिसांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशन
मध्ये भारतीय क्रिकेट संघातील मोहम्मद अझररूद्दीन, मनोज प्रभाकर, अजय जडेजा त्याचप्रमाणे अफ्रिकन संघातील निकी बोए, हर्शेल गिब्ज या खेळाडूंचाही समावेश असल्याचे पोलिस
तपासाअंती स्पष्ट झाले. अशा या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात
एकच खळबळ उडाली. पाकिस्तान या देशातून सूरूवात झालेल्या या मॅच फिक्सिंग प्रकरणात
भारतीय खेळाडूंचाही समावेश असल्याने क्रिकेट जगतात भारतीय क्रिकेट संघाची प्रतिमा
मलिन झाली.
स्टिंग
ऑपरेशनद्वारे मॅच फिक्सिंग प्रकरण बाहेर आणण्याचे महत्त्वाचे कार्य करणा-या
अनिरूध्द बहल आणि तरूण तेजपाल यांचे कौतूक करायलाच हवे. त्यांच्या या
शोधपत्रकारितेमुळे भारतीय क्रिकेटमध्ये चालणा-या अनैतिक प्रकारांवर प्रकाश पडला.
यापुढे प्रत्येक खेळाडूला असले प्रकार करताना आपल्या देशाच्या प्रतिमेचा आणि
क्रिकेटच्या सभ्यतेचा विचार करावाच लागतो. यातुनच नविन क्रिकेट
खेळाडूंनी बोध घेऊन आपल्या कारकीर्दीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागुन न देता चांगले
क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. जेणेकरून क्रिकेटचा दर्जा, सभ्यता ही पूर्वी इतकीच
टिकून राहील.!!!!!!!

खेळाडू
|
देश
|
वर्ष
|
शिक्षा
|
सलिम मलिक
|
पाकिस्तान
|
१९९४
|
आजीवन क्रिकेट खेळण्यास
बंदी
|
अता-उर-रेहमान
|
पाकिस्तान
|
२०००
|
आजीवन क्रिकेट खेळण्यास
बंदी
|
मोहम्मद आमिर
|
पाकिस्तान
|
२०१०
|
५ वर्षे क्रिकेट खेळण्यास
बंदी
|
मोहम्मद आसिफ
|
पाकिस्तान
|
२०१०
|
७ वर्षे क्रिकेट खेळण्यास
बंदी
|
सलमान बट्ट
|
पाकिस्तान
|
२०१०
|
१० वर्षे क्रिकेट
खेळण्यास बंदी
|
मौरिस औदुंबे
|
केनिया
|
२०००
|
५ वर्षे क्रिकेट खेळण्यास
बंदी
|
मार्लोन सॅम्युअल्स
|
वेस्ट-इंडीज
|
२००३
|
२ वर्षे क्रिकेट खेळण्यास
बंदी
|
हॅन्सी क्रोनिए
|
दक्षिण अफ्रीका
|
१९९९
|
आजीवन
क्रिकेट खेळण्यास बंदी
|
हर्शेल गिब्ज
|
दक्षिण अफ्रीका
|
२००२
|
६ महिने क्रिकेट खेळण्यास बंदी
|
निकी बोए
|
दक्षिण अफ्रीका
|
२००२
|
६ महिने क्रिकेट खेळण्यास बंदी
|
मोहम्मद
अझररूद्दीन
|
भारत
|
२०००
|
आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी
|
अजय शर्मा
|
भारत
|
२०००
|
आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी
|
मनोज प्रभाकर
|
भारत
|
२०००
|
५ वर्षे क्रिकेट खेळण्यास बंदी
|
अजय जडेजा
|
भारत
|
२००३
|
५ वर्षे क्रिकेट खेळण्यास बंदी
|

सध्या क्रिकेट विश्वात आयपीएलचे वारे सर्वत्र जोरात वाहत आहेत. मुंबई,
हैद्राबाद, चेन्नई, दिल्ली, पंजाब, बंगळूर, राजस्थान, कोलकाता असे देशातील प्रमुख
शहरांचे संघ आयपीएलमध्ये आहेत. आता पुणे, कोची या शहरांच्या संघाचाही त्यात समावेश
झाला आहे. यात गुजरातचा संघ सहभागी नसल्याने, सगळेच क्रिकेट खेळले तर सट्टा कोण
लावणार ? याप्रकारचा गुजराथी एसएमएस मध्यंतरी खुप चर्चेत होता. गल्लीबोळात क्रिकेटवर
सट्टा लावला जात असल्याने ही बाब सामान्य झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
क्रिकेटमध्ये सट्टा लावणे हे फार पूर्वीपासून प्रचलीत आहे. दोन संघांपैकी कमकुवत
संघावर पैसे लावले तर अधिक परतावा मिळतो आणि बलाढ्य संघावर लावल्यास कमी परतावा
मिळतो. यामध्ये कोणता संघ जिंकतो त्यावरून कोणाचा नफा किंवा तोटा झाला हे समजते.
यावर सट्टेबाजांना ग्राहकांनी लावलेल्या बोटींगनुसार नफा किंवा तोटा होई.
No comments:
Post a Comment