Monday, 19 November 2012

माध्यम आणि प्रचार



जसजसा काळ बदलत गेला त्याप्रमाणे समाजही बदलत गेला. समाजातील या बदलांमुळे जनमाध्यमातही बदल घडून आले(उदा.Television, Radio, News paper, Internet, Mobile Etc.),त्यांचे स्वरूपही बदलून गेले.त्यामुळे आधुनिक जगतातील पिढीचा प्रत्येक माध्यमातील वापरात थोडाफार का होईना बदल हा झालाच आहे.हल्ली इतर माध्यमांच्या तुलनेत आकाशवाणी कुठेतरी कमी पडत चाल्याचे चित्र या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणवत आहे.परंतू जरी असे असले तरी आजही ते आपला प्रेक्षक वर्ग टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत जरी नविन पिढी त्याचा वापर करीत नसली तरी....पूर्वी आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या दिवसाची सुरूवात आकाशवाणीवरील भक्तीगीते, बातम्या, आरोग्यम् धन संपदा.....यासारख्या अनेक कार्यक्रमांनी व्हायची. त्यामुळे आकाशवाणीने एका विशिष्ट काळात आपला ठसा उमटवल्यामुळेचे ते आजही आपला प्रेक्षकवर्ग टिकवून आहेत. त्यामुळे येथे विशेष नोंद करावीशी वाटते ती म्हणजे जे आकाशवाणील त्या काळात जमले ते आताच्या Television, Radio, News paper, Internet यासारख्या माध्यमांना जमेल असे वाटत नाही. कारण आज जगात माध्यमातील स्पर्धा इतकी शिगेला पोहोचली आहे की, प्रत्येक माध्यमात दिवसागणीक नवनविन शोध घडून येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्गाला अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने तो फक्त एकाच माध्यमावर अनेक वर्ष अवलंबून राहणे शक्यच नाही..त्यामुळेच सध्या माध्यमातील प्रगल्भता वाढत चालल्याचे वाटत आहे.
  अशा या प्रगल्भ माध्यम युगात आपली भूमिका, अजेंडा, कार्यक्रम प्रसारीत करण्यापूर्वी प्रचार हा आवश्यक वाटतो. असा हा प्रचार जनेतून पसंतीस उतरतो कि नाही हे या सर्वेच्या माध्यमातून तपासून पाहत आहोत....
   असा हा सर्वे करीत असताना वयोगटाची अट ठेवण्यात आली नाही. नेहमी किमान Television, News paper चा आस्वाद घेणारे नमुने ह्या सर्वेक्षणासाठी निवडले. हल्लीच माध्यमांच सादरीकरण कशा स्वरूपाच असत हे लक्षात घेऊन प्रश्नांची निवड केल्याने त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपातही प्रतिसाद मिळाला.निवडलेल्या २० नमुन्यांमधून असे लक्षात आले की त्यांच्या माध्यमांकडून खूप अपेक्षा आहेत अधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात लोकमाध्यमे ज्या पध्दतीने आपली भुमिका जनतेसमोर मांडत आहेत किंवा सादर करत आहेत, हे पाहता जनतेच्या दृष्टीकोनातून ही माध्यमे खात्रीलायक आहेत की नाही असा प्रश्नही आधुनिक काळात उपस्थित होतो.परंतू असे असतानाही या सर्वेच्या माध्यमातून निम्म्याहून अधिक लोक माध्यमांच्या सादरीकरणावर सामाधानी असल्याचे चित्र पहावयास मिळाले.उदा. टिव्ही वर अनेक कार्यक्रम आपला प्रसार करण्यासाठी एखादी स्पर्धा आयोजित करतात किंवा स्पर्धात्मक कार्यक्रम (होम मिनिस्टर, आता तुम्ही मालामाल(ATM),कोन बनेगा करोडपती इ.) जनतेला आर्थिक स्वरूपातील फायदा मिळवून देत असतात. त्यामुळे असे कार्यक्रम जनतेत खरोखरच लोकप्रिय होत आहेत. परंतू तरीही स्वयंवर सारख्या कार्यक्रमांतून माध्यमांची हरवलेली नैतिकता, सामाजिक विटंबना, प्रातवाद,पक्षपातीपणा यासारख्या गोष्टी पहावयास मिळत असल्याने असे कार्यक्रम जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत हे लक्षात येत. यावरून माध्यमांचे असलेले सामाजिक भान देखिल अधोरेखित होते.वाढत्या स्पर्धात्मक युगात माध्यमांची जबाबदारी आणि नैतिकता मुळ उद्देशापासून भरकटत चालली आहे. सध्या अनेक रिअँलिटी शो च्या माध्यमातून (उदा. डान्स इंडिया डान्स, झलक दिखलाजा, इंडियन आयडॉल इ.) एक नवा ट्रेंड उदयास आलेला पहावयास मिळत आहे. चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वी चित्रपटातील सर्व स्टारकास्ट मंडळी रिअँलिटी शो च्या माध्यमातून आपल्या प्रचाराची पोळी भाजून घेतात. परंतू यात फायदा कोणाचा होतो ही दूय्यम बाब आहे. परंतू तरीही अशा मंडळींनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याने कधी नव्हे इतका जास्त टिआरपी कार्यक्रमाला लाभतो. या सर्वेच्या माध्यमातून असे लक्षात आले  काही मंडळींच अस म्हणण आहे  की, अशा चित्रपटांना खरंच जनतेच्या कसोटीत उतरायचे असेल तर त्यांनी दर्जा सादर करावा प्रचाराची अशी पध्दत काही कामाची नाही.कारण अशाप्रकारे प्रचार केल्याने सुध्द अनेक चित्रपट Box Officeवर फ्लॉप झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिल आहे(उदा. तीस मार खाँ, बोलबच्चन)
   माध्यमांनी जर आपल्या नैतिकतेच भान ठेवून आचरण केल तर जनतेची विश्वासहर्ता देखिल यांना आपोआपच मिळेल. नाहीतर अमेरिकन माध्यमांच्या विश्वासहर्तेची जी आज अवस्था आहे तशीच काहीशी स्थिती भारतात उद्भवल्या शिवाय राहणार नाही.हल्ली माध्यमांना समाजप्रबोधनाचे कमी परंतू व्यवसायीकतेचे स्वरूप जास्त प्राप्त झाल्याचे या सर्वेच्या माध्यमातून लक्षात आले. कारण सर्वजण टीआरपी च्या  मागे धावत असल्याने दर्जाबद्दल कोणी जागरूक नसल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment