|
ह
|
ल्लीच्या अधुनिक माहिती आणि तंत्रज्ञान तसेच
माध्यम प्रगल्भतेच्या काळात काही गोष्टी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. अधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकांची एखाद्या विषयाच्या खोलवर
जाऊन त्याबद्दल माहित जाणून घेण्याची भुकही त्यामुळेच वाढली. अशावेळेस अनुवादीत साहित्य,
माहितीला महत्त्व प्राप्त होते ते यासाठीच की जर एखाद्या गोष्टीबद्दल परकीय भाषेत विस्तृत
असे लिखाण केले असल्यास अनुवादीत केलेल साहित्य उपयोगी पडत. यातुनच आपल्याला
अनुवादीत केलेल साहित्य ग्रहण करणे शक्य होत.
एवढ्या
गोष्टींची जरी थोड्याफार प्रमाणात उणिव भासत असली तरी आता मात्र अनुवादाच्या
बाबतीत एवढी बिकट परिस्थिती राहिलेली
नाही. आजच्या घडीला साहित्य विश्वात अनेक अनुवादीत साहित्य उपलब्ध आहेत आणि
त्यांचा दर्जा सुध्दा अपेक्षीत असाच आहे. उदाहरणच घ्यायच झाल तर अनेक धर्म ग्रंथ
जसे की कुराण, बायबल, भगवद्गीता इ. च अनुवादन केलेल आहे. त्यामुळे एखाद्या धर्माची
संकल्पना आपल्या भाषेत जाणून घेण्याची चांगली संधी वाचकांना प्राप्त झाली आहे.
जर
कोणत्याही दोन भाषा एकमेकांशी संबंधीत अथवा मिळत्या जुळत्या असतील तर अनुवाद करत
असताना कोणत्याही समस्या येत नाहीत (उदा. मराठी-हिंदी, हिंदी-ऊर्दू). प्रत्येक
भाषेतील शब्दांची रचना किंवा वाक्य रचना एका विशिष्ठ पध्दतीने आराखडीत केलेली
असते. ही आराखडीत केलेली रचना त्या भाषेतील व्याकरणाला अनुसरून असते. अनेक वेळा
व्याकरणाची रचना (दोन भाषांतील) वेगळी असल्याने माहितीचा सार बदलण्याची शक्यता
असते. त्यामुळे अनुवादन करत असताना ती माहिती कोणत्या संस्कृतीतून आली आहे याच भान
बाळगणे आवश्यक आहे कारण प्रत्येक साहित्यात स्थानिक संस्कृतीच प्रतिबिंब उमटत असत
त्यामुळे अनुवादनात संस्कृतीच प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे
मराठी
किंवा हिंदी भाषेत ज्याप्रमाणे आदरार्थी शब्द, वाक्य असतात तशी आदरार्थी वाक्य
रचना इंग्रजी भाषेत नसते. आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तीला आपण आदराने हाक मारतो
किंवा त्यांच्याशी संवाद करत असताना आदरार्थी वाक्य रचनेचा वापर करत असतो.
No comments:
Post a Comment