Monday, 19 November 2012

भाषा प्रतिःभाषा. . .





   


भा
षा हे जनमानसात संवाद साधण्याचे उत्तम आणि गरजेच साधन आहे.कोणत्याही भाषेशिवाय संवाद पूर्ण होऊच शकत नाही. आपल्या अवगत भाषेत आपण विचार करत असतोय.भाषेवर प्रभूत्व आणि शब्द भांडार असेल तर ती भाषेचा अर्थ आपण कोणत्याही कोनातून तीचा सार न बदलता बदलू शकतो. ही एकप्रकारची कलाच आहे. परंतू काहीवेळा भाषेचे दूसरे अर्थ काढल्याने अनर्थ किंवा गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या व्यक्तिकडे शब्द भांडार/प्रतिशब्द, योग्य वेळी अचूक शब्द वापरण्याची कला अवगत असते अशा व्यक्तींची विचार करण्याची क्षमता अधिक असते. विशिष्ठ भाषेतील काही शब्दांना त्या समाजात सर्व मान्यता असतेही, परंतू काही वेळा मान्य नसणारे शब्द वापरल्याने त्या भाषेचा सार बदलण्याची किंवा भाषेबद्दलचा आदर कमी होण्याची शक्यता असते.
       हल्लीच्या अधुनिकतेच्या काळात समाजात अनेक बदल होताना दिसत आहेत त्याचप्रमाणे भाषेच्या शब्द रचनेतही हे बदल घडत आहेत. मुळ भाषेवर दूस-या भाषेच अतिक्रमण, दैनंदीन जीवनशैलीत होणारे बदल, सामाजिक जिवन यासारख्या अनेक घटक परिणामकरक ठरत आहेत. या सर्वांना अधुनिक तंत्रज्ञानही तेवढेच जबाबदार आहे.आताच्या तरूण पिढीचच उदाहरण घ्याना... हल्लीची तरूण पिढी शब्द रचनेत बदल करण्यात नवनविन शोध लावण्यात आघाडीवर आहे. मोबाईल, इंटरनेट यासारख्या यंत्रणांद्वारे संवाद साधत असताना मुळ शब्दाला अनेक प्रतिशब्द किंवा लघुशब्द निर्मित करतात (उदा. Good Night- Gd n8,  Before-B4,  Late-L8,  Happy Birthday- Happy b’day  etc. )त्यामुळे भाषेवरील अतिक्रमण, अत्याचार वाढण्याची शक्यता येणा-या पिढीकडून अधिकच वाटत आहे.
   यात माध्यमाच्या दृष्टीकोनातून बोलायचे झाल्यास स्थानिक भाषेतील लोकांचे प्रबोधन करत असतात.परंतू अधुनिक बदलत्या काळाची झळ माध्यमांना बसली आहे. तरूण पिढीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाषेवर अतिक्रमण- अत्याचार करण्यात माध्यमेही तेवढाच पुढाकार घेत आहेत.(उद. मराठी वृत्तवाहिन्यांत सर्रास Breaking News,  News Flash, Prime Time/Watch etc.शब्दांचा एक Trend म्हणून वापर करत आहेत. ) यामुळे येणा-या पिढीकडून भविष्यात आपल्या भाषेच संवर्धन होईल असे वाटत नाही. कारण माध्यम ही समाजाच प्रतिबिंब  आहेत. अशी ही माध्यम जर भाषेच्या वापराबद्दल उदासिन असतील, Trend प्रमाणे चालण्यात जर धन्यता मानत असतील तर येणा-या पिढीकडून तरी भाषीक संवर्धनाची काय अपेक्षा ठेवणार.
   लुड्विग विट्जेंस्टाइन यांनी म्हटल्याप्रमाणे जर भाषेच्या नियमावलीत बसणारे शब्द वापरले नाहीत तर खरंच भाषेचा होणारा ह्रास

No comments:

Post a Comment